Thursday, April 4, 2013

४ एप्रिल २०१३


४ एप्रिल २०१३
आज किती दिवसांनी डायरी सापडली. मागची काही पाने चाळ ली आणि लक्षात आल किती दिवस काय ? महिने झाले लिहून. मी ठरवला होत कि अगदी रोज नाही पण जेव्हा जेव्हा जे काही लक्षणीय घडेल ते या डायरीत लिहायच पण गेल्या काही दिवसात सगळच आयुष्य इतक उलट पालट झाल कि काय लिहाव काय नाही ते कलळच नाही. माझी मुंबई हून पुण्याला बदली काय झाली आणि सगळीच घडी विस्कटली. पण आता मला रतन आणि स्वातीची माझ्या आयुष्यातलं महत्व कळल. इतके दिवस कसे तरी होस्टेल मग PG म्हणून राहिलो तेव्हा घराची आणि स्वातीच्या जेवणाची किंमत कळली. पण अखेर रतन ची परीक्षा संपवून स्वाती काल सार सामान घेऊन काल इथे आली आणि माझ्या जीवात जीव आला. 
आली ती नेमकी सगळी कडे बंद असताना  त्यामुळे भाजीपाल्याची बोंब झाली पण तरी हि तिने बाहेर जेवायला जायचा आग्रह न धरता घरात च पिठलं भात केला . मन भरून पावलं आणि सा मान आवरताना आज डायरी सापडली पान मागच्याच वर्षीची आहेत पण तरीही मी हीच वापरणार आहे. कारण पाने जुनी असली तरी त्यातले माझे अनुभव कायम स्वरूपी चिरतरुण आहेत. 

No comments:

Post a Comment